सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे मन कामनापूर्ति ॥ जय देव...
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरेजड़ित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥ जय देव...
लंबोदर पीतांबर फणीवर बंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकष्टी पावावें, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे मन कामनापूर्ति ॥ जय देव...
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.